Home » जळगाव » अतिवृष्टी झालेल्या गावांना तात्काळ मदत मिळावी ; शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने मागणी

अतिवृष्टी झालेल्या गावांना तात्काळ मदत मिळावी ; शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने मागणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील सर्व मंडळात दि. १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके आणि घरांची पडझड होऊन झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

दरम्यान केळी, फळबाग, मका, कपाशी, उडिद, मुग इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करून एकरी पंचविस हजार रूपये नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे मागणी केली असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. तसेच लवकरात लवकर पंचनामे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

जिल्ह्यात सलग तीन दिवस ढगफूटी सदृश्य अतिवृष्टी झाल्याने शेत पिके तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर तलाठी, सर्कल, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी आदींमार्फत तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत शासनाला कळवावे, तसेच जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपनेतेगुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनावणे, शेतकरी अशोक खंडू बडगुजर, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, गुलाबराव कांबळे, डॉ.रमाकांत कदम, सचिन चौधरी, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, विजय बांदल, हनु पठाण, किरण ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!