जळगाव ( वास्तव पोस्ट ) : IT DigiTech Solutions द्वारे जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंचा समावेश करून जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२५ (JBCL सीजन २) चे दि.१६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोरजाबाई टर्फ येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. सर्व संघामध्ये खेळाडू हे ग्रेड निहाय समान निवड पध्दतीने देण्यात आल्याने सर्व संघ तुल्यबळ होते.
सदर लिग स्पर्धेत या वर्षीचा विजेता संघ- रे फाउंडेशन तर उपविजेता संघ- ट्रिपगुरु टूरिझम तसेच तिसरे स्थान- महाजन बेकर्स आणि चौथे स्थान- स्पार्टन या संघाने पटकावले. सर्व विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
JBCL पर्व २ च्या यशस्वीपणे आयोजनात सर्व स्पॉन्सर, JBCL आयोजन समितीचे अक्षय पाटील, गणेश पाटील, हितेश मराठे, माही जाधव, स्वप्नील पाटील, ऋषिकेश पाटील, कल्पेश बाविस्कर, राहुल कदम आणि मित्र परिवार यांनी मेहनत घेऊन काटेकोरपणे नियोजन करून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.
