जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, सहसचिव राजकुमार सेठीया, कोषाध्यक्ष कमल पारेख, सदस्य सुभाष पाटील, देवेंद्र अग्रवाल, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच पालक सदस्या रुपाली पाटील व सोनाली चौधरी यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थोर व्यक्तींच्या वेशभूषा साकारल्या. त्यात इरा उमरे- राणी लक्ष्मीबाई, गारवी साळी- भारत माता, पुष्कराज मराठे- सुभाष चंद्र बोस, पियुष पाटील- चंद्रशेखर आझाद, ईशान पवार- लोकमान्य टिळक, अंश वानखेडे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अश्विनी अलावे-डॉ. अब्दुल कलाम, हर्षद गुरव -भगतसिंग, हर्ष नन्नवरे -महात्मा गांधी, तसेच आरुषी पाटील -सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा सादर करून त्यांचे मनोगत व्यक्त केले. महेश्वरी घोगरे, चैतन्य पाटील व योगिनी राठोड या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले विचार मनोगतातून व्यक्त केले.

यावेळी इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्ग मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांचा तसेच शाळा प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची संगीतमय कवायत संचलन व डंबेल्स कवायत संचलन घेण्यात आले. पालक शिक्षक संघातर्फे होतकरू, आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांनी शाळेच्या वाढदिवसानिमित्त संस्था व शाळा यांचा ३३ वर्षाचा यशस्वी वाटचालीचा प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांची परिसरातून रॅली देखील काढण्यात आली होती.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया यांनी स्वातंत्र्यानंतर देशाने केलेल्या विकासाबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आज शाळेच्या वाढदिवसानिमित्त अध्यक्ष डॉ. डाकलिया यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आज शाळेला ३२ वर्षे पूर्ण झाले असून ३३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. तीस विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या या शाळेत आज सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मानव सेवा विद्यालयाच्या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात झालेले रुपांतर याचे वर्णन आपल्या मनोगतातून केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली साळुंखे यांनी तर आभार गिरीष जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
