Home » जळगाव » डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २५० विद्यार्थ्यांचा सत्कार

डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २५० विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे दि. ३ ऑगस्ट रोजी स्वर्गीय डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त हजरत बिलाल (रजि.) बहुउद्देशीय संस्था आणि लोकशक्ती प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी व भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पराग घनश्याम कोचुरे होते. मागील आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.

इ. १० वी व १२ वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी ठरलेले तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या अशा २५० विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या प्रभावी वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘समाज’ व ‘शिक्षण’ विषयक मुद्द्यांवर प्रभावशाली भाषण केले. आदर्श शाळा म्हणून प.न. लूकंड कन्या शाळेला “आदर्श शाळा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

समाजसेवकांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या अजमल शाह अब्दुल्ला शाह, अ‍ॅड. सलीम इसाहक शेख, मोहसिन खाटीक, अशफाक बागवान, इरफान बागवान, पी.एम. पाटील, साबीर शाह, वर्षा अहिरराव, जमीलुद्दीन शेख, अमजद पठाण या समाजसेवकांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात डॉक्टर, शिक्षक, वकील यांचाही समावेश होता.

सदर कार्यक्रमास दिलीप पाटील (कुस्ती समिती अध्यक्ष), खलील शेख (शिक्षण विस्तार अधिकारी), नीता वानखेडकर, रफिक शेख, धारा ठाकर (लोकशक्ती प्रतिष्ठान अध्यक्षा) अकिल अब्दुल्ला, जागृती सुर्वे, मयूर सोनार, प्रेरणा गुजर, पंकज सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

पराग कोचुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की “मेहनत, शिस्त आणि समाजसेवेची भावना याच गोष्टी विद्यार्थ्याला श्रेष्ठ नागरिक बनवतात. माझे वडील, स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांनी हेच तत्त्वज्ञान आयुष्यात पाळले.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमल शाह यांनी तर आभार प्रदर्शन अकिल पहलवान यांनी केले. हा कार्यक्रम अ‍ॅड. सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यक्रमास पालक, शिक्षक, समाजसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!