Headlines
Home » जळगाव » विविध योजनांच्या अंमलबजावणी विषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न

विविध योजनांच्या अंमलबजावणी विषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्राम रोजगार सेवक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. बैठकीत पाणलोट क्षेत्रातील जलसंधारणाचे उपाय, वृक्षारोपण मोहिम व हरित आच्छादन वाढविण्याचे उद्दिष्ट तसेच ग्रामपातळीवरील गृहप्रकल्प व घरकुल योजनांची अंमलबजावणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, तसेच सर्व ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कामाच्या गुणवत्ता वाढीसोबतच गावपातळीवरील योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!