जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २१ जून रोजी जळगावात ‘योग संगम’ या सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय ( भारत सरकार ) यांचे ‘’एक पृथ्वी एक आरोग्य“ या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सकाळी ६:४५ वाजता सुरु झाला.
या ‘योग संगम’ कार्यक्रमात ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ नुसार राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत योग साधनेचे प्रात्यक्षिक उपस्थित प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून करून घेतले. यामुळे योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे समाजात रुजण्यास मदत होईल.
कार्यक्रमास योग शिक्षक प्रा. परेश संनसे (सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी) उपस्थित होते. यावेळी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद करण्यात आले. त्यांनी सांगितले की योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. योगा तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असून मानसिक संतुलन व आत्मिक शांती साधणारा मार्ग आहेत. या योग सत्रात प्राणायाम, विविध योगासन आणि ध्यान धारणा यांचा समावेश होता.
उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून कार्यक्रमात एकरूपता साधली. “नियमित योगाभ्यास करा, निरोगी आयुष्य जगा,” असा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी कार्यक्रमातून दिला. या प्रसंगी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन डॉ. सी.एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् प्रा.गणेश पाटील, आयक्यूएसी समन्व्यक प्रा. कल्पेश महाजन व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
