Headlines
Home » शैक्षणिक » महावीर क्लासेसच्या आयआयटी, नीट, सीईटी, फाउंडेशन बॅचेसना उत्स्फूर्त प्रतिसाद

महावीर क्लासेसच्या आयआयटी, नीट, सीईटी, फाउंडेशन बॅचेसना उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आयआयटी, नीट व एमएचटी-सीईटीची अचूक तयारी करवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथील महावीर क्लासेसच्या बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू असून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या सर्व बॅचेस सुरू होत असल्याची माहिती महावीर क्लासेसच्या वतीने देण्यात आली.

महावीर क्लासेस चे वैशिष्ट्य म्हणजे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रवेश परीक्षेच्या दृष्टिकोनातून बदलत्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन करतात. प्रकरणानुसार अचूक मार्गदर्शन, परीक्षेबाबत मनातील भीती कमी व्हावी यासाठी प्रकरणनिहाय त्रिस्तरीय परीक्षांचे आयोजन, टप्प्याटप्प्याने परीक्षांची काठीण्य पातळी वाढवण्याचे नियोजन, संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिका करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले जाते. विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेण्यावर विशेष भर दिला जातो. पालकांशी सुसंवाद, नाविन्याचा ध्यास, नियमित परीक्षा व मूल्यांकन, प्रदीर्घ अनुभव इत्यादीचा विशेष फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.

महावीर क्लासेसचे स्वतःचे अद्ययावत असे सुसज्ज ग्रंथालय आहे. क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांना नामांकित मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. मूलभूत तयारी व पक्का पाया या बळावर अनेक विद्यार्थी देश-विदेशात उत्तुंग करिअरचे यश चाखत आहेत. यामुळे या कोर्सच्या प्रवेशासाठी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!