पुणे दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुण्यात खून सत्र काही थांबत नसुन सलग चौथ्या दिवशी पुण्यात खून झाला आहे .
पुण्यात आज झालेल्या खुनाची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असुन त्यावरून दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे .पोलिसांनी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या आरोपींना ताब्यात घेतले असुन चौकशी केली असता त्यातील एकाचा मोबाईल काही दिवसांपूर्वी चोरी झाला होता . मृत वर्षा थोरात या महिलेने मोबाईल चोरल्याचा संशय या दोघांना होता . मोबाईल बद्दल विचारणा करत असताना त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली , वर्षा थोरात या महिलेला त्यांनी काठीने मारहाण केली . त्यात तिच्या डोक्यात काठीचा घाव बसल्याने ती वर्षा थोरात ही महिला खाली कोसळली . रुग्णालयात दाखल कारण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा थोरातला दारुचे व्यसन होते. अब्दुल सय्यद हा अंडा भूर्जीचा व्यवसाय करतो. फरासखाना पोलिसांनी अब्दुल आणि गौरव या दोन जणांना अटक केली आहे.
