Headlines
Home » होम » के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर वर कार्यशाळा

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर वर कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी  तीस दिवसीय लॅटेक्स आणि सिलॅब या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . अद्ययावत सॉफ्टवेअर बाबत  विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सुमारे १८१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.

सदर ऑनलाईन कार्यशाळेत सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर चा वापर कसा करावा या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोडिंग भाषेचा उपयोग करून विविध प्रकारचे नवनवीन सॉफ्टवेअर कसे तयार करावे या बाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ओपन फ्री सॉफ्टवेअर चा उपयोग जास्तीत जास्त करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा. प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. एफ.ओ.ओ.एस. सेंटरचे समन्वयक प्रा. अविनाश सूर्यवंशी, वर्कशॉप कोऑर्डिनटोर प्रा. रुची गुल्हाने यांनी कार्यशाळेचे आयोजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!