Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक

धुळे ( वास्तव पोस्ट ) : कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थींना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या १० मार्च, २०२५ च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी ११ महिने करण्यात आला आहे. या वाढीव ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या उमेदवारांनी १० मार्च, २०२५ किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, धुळे यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच आधार सिंडीग होईल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधार सीडींग करावे लागणार आहे.

ज्या आस्थापना या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. १० मार्च, २०२५ च्या शासन निर्णयानुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे, तोच बँक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन डीबीटी साठी नमुद करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!