जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बिलवाडी ता. जि. जळगांव येथील कुरकुर नाल्यात बहुळा धरणाचे पाणी सोडणे व बिलवाडी केटीवेअर भरणे करिता बिलवाडी चे लोकनियुक्त सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप तसेच डोमगाव सरपंच विश्वनाथ मंडपे, पाथरी सरपंच अर्जुन सिरसाळ, माजी सरपंच प्रदिप अंकुश पाटील, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यांच्या तर्फे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विनंती करण्यात आली होती.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार बहुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असून, पाणी सामनेर पर्यंत आले आहे. या पाण्यामुळे बिलवाडी, डोमगाव, वडली व पाथरी परिसरातील गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान नागरिकांनी रात्री अपरात्री नाल्यात उतरू नये, तसेच आपली गुरे ढोरे नाल्यात नेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
