Headlines
Home » सामाजिक » वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष व सचिवांचा सत्कार

पाचोरा | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आणि सचिवांचा आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

या संदर्भातील माहिती अशी की, पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन येवले तर सचिवपदी सागर कोटेचा यांची अलीकडेच निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मान्यवरांचा आज वैशालीताई आणि नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांच्याहस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राहूल संघवी, कल्पेश संघवी, प्रमोद ललवाणी, नेमीचंद बांठीया, नारायण मोर व प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!