Headlines
Home » क्रीडा » सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

जळगाव वास्तव पोस्ट (प्रतिनिधी)दि.१४शहरातील के सी ई चे मुळजी जेठा महाविद्यालय जळगावची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल वाल्मीक हटकर हीची आय टी एम विद्यापीठ, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. सोनल हटकर ही बास्केटबॉलची एन.आय.एस. सर्टिफाईड प्रशिक्षक ,राष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा देखील उत्तीर्ण आहे व गेल्या सहा वर्षापासून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व विविध खेळात करीत आहे सोनल हटकर च्या निवडीबद्दल जैन इरिगेशन चे चेअरमन अशोक जैन, जैन स्पोर्ट्स चे अध्यक्ष अतुल जैन क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, विभाग प्रमुख प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. निलेश जोशी प्रा. प्रवीण कोल्हे प्रा.यशवंत देसले, प्रा. डॉ. रणजीत पाटील, फारुक शेख तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी,जैन स्पोर्ट्सचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील सर्व प्रशिक्षक व खेळाडु वर्ग यांनी अभिनंदन केले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!