Headlines
Home » सामाजिक » जळगाव जिल्हा वकील संघातर्फे महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

जळगाव जिल्हा वकील संघातर्फे महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज सकाळी ८ वाजता ओंकारेश्वर मंदिर जळगाव येथे महाशिवरात्री निमित्त मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने जळगाव जिल्हा वकील संघाकडून पाणपोईची व्यवस्था करून पाणी वाटप करण्यात आले.

पाणपोईचे उद्घाटन माननीय जिल्हा न्यायाधीश श्री. राजुरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोबत श्री बढे साहेब, सौ. राजूरकर मॅडम, सौ. बढे मॅडम, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री. रमाकांत सर व मॅडम, उपाध्यक्ष ॲड. अनिल पाटील व सौ. पाटील मॅडम सह सचिव ॲड श्रद्धा काबरा मॅडम, तसेच कार्यकारणी सदस्य ॲड श्री राजेंद्र कुमार चौधरी ॲड ऐश्वर्या मंत्री, ॲड मंगला पाटील मॅडम, वकील सभासद व तायडे सर यांची उपस्थीती होती.

अतिशय स्फुर्तीदायी असा हा आजचा योग फारच अप्रतिम होता. त्यातच महत्वाचे म्हणजे जागतिक महीला दिन व महाशिवरात्री असा योगायोग साधुन जळगाव जिल्हा वकील संघ कार्यकारणीच्या वतीने ही भन्नाट कल्पना फक्त विचारातच नाही तर साक्षात साकारली. महाशिवरात्रीच्या ह्या पावन दिनी सदर उपक्रम राबवुन समाजा प्रती स्नेहाची आपुलकीची भावना यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!