मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, ( प्रतिनिधी ) दि.२६: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार झिशानबाबा सिद्दिकी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनोज गुहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागुल, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अंजली भोसले, तेजस…

Read More

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, ( प्रतिनिधि ) दि.२६ : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण ;

विजयवाडा ( प्रतिनिधी ): आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले. विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा डॉ.आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे. या पुतळ्याची उंची सुमारे २०६ फुट इतकी…

Read More

कजगाव येथे महाप्रसाद वाटप

कजगाव ( प्रतिनिधि ) कजगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री शाकंभरी देवी नवरात्र निमित्त ६४ प्रकारच्या फळभाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. हा नेवैद्य अन्नपूर्णा माता आई भगवती श्री शाकंभरी देवीला अर्पण करण्यात आला. गावातील सर्व सेवेकरी यांनी हा नैवेद्य दाखवला. तसेच प्रसाद म्हणून या नैवेद्याचे वाटप करण्यात आले.

Read More

प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण-अशोक जैन

जळगाव, दि.२५ (प्रतिनिधी)- “भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती देण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होय !” तसेच महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या…

Read More

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आरडीसी परेडमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची मयुरी महाले

जळगाव दि. २५ ( प्रतिनीधी ) : येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून मयूरी महाले ही एकमेव आहे. ती दिल्लीला रवाना झाली असून आपल्या जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे.श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या…

Read More

१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेसाठी अधिक वेळ मिळणार

मुंबई ( प्रतिनिधी ) : दि २४ , राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा पुढच्या आठवड्यापासून सुरु होत आहे. या परीक्षेतील प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिटं अधिकची मिळणार आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक आणि शिक्षकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने हा निर्णय घेतला . दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत पेपर सुरु होण्यापूर्वी १०…

Read More

समतोल प्रकल्पा तर्फे ” राष्ट्रीय बालिका दिवस ” साजरा

जळगाव ( प्रतिनिधि ) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे आज २४ रोजी गवळी वाडा , जळगाव या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला.मुलींचे अधिकार ,हक्क , त्यांना मिळणाऱ्या संधीचे सोन व्हावे त्यांची ताकद व क्षमता वाढावी. देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानता बद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी , हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय बालिका दिवस…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर

मुंबई ( प्रतिनिधि ) दि.२४ , लोकसभा निवडणुकीचा धुमाकुळ तसेच आचारसंहिता लागण्याआधी भाजप आणि मित्रपक्ष प्रणीत सत्ता असलेले सर्व मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या वारी करणार असल्याचे समजते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. अयोध्येतील मंदिरात दि २२ रोजी…

Read More

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी मनोज जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई ( प्रतिनिधि ) दि.२४, मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईकडे कूच केलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच या आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट करत या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनामुळे कायदा व…

Read More

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न – सुयोग्य, दूरदृष्टीचा निर्णय ;भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर ( प्रतिनिधी) दि. २३, दलित्तोद्धारासाठी आपले जीवन खर्ची घालणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा अतिशय सुयोग्य, दूरदृष्टीचा व आनंदाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी एक्स वर आपली प्रतिक्रिया नोंदविताना कर्पूर ठाकूर यांना दिलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार अधिक न्याय्य…

Read More

बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी तिन दिवसांपासुन साखळी उपोषण सुरू;

जळगाव (प्रतिनिधी ) दि .२३ महिला व बालविकास विभाग यांच्या कडे अत्यंत गंभीर स्वरुपाची तक्रार दिनांक २९/१२/२०२३ रोजी सादर करण्यात आली आहेबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ प्रमाणे बाल कल्याण समिती, जळगांव कार्यरत आहे.मिशन वात्सल्य गाईडलाईन नुसार समिती सदस्यांना तसेच अध्यक्षबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ (७)(१)नुसार…

Read More

“आमदार चषक” राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरचे वर्चस्व.

मा. ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे भव्य राज्यस्तरीय तायक्वोंदो आमदार चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन पुणे ( प्रतिनिधि ) : दि. २३ उच्य व तांत्रिक शिक्षण मंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे महाळुगे, बालेवाडी क्रीडा नगरी मध्ये भव्य आमदार चषक राज्यस्तरीय सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्य स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर व मुंबई…

Read More

जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी .

जळगाव ( प्रतिनिधि ) दि .२३ एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात ३४६ धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ १८९ धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद १०१ धावांची खेळी केली. जळगाव संघातर्फे धवल हेमनानी याने ४७/४, कर्णधार जगदीश झोपे याने ३९/३…

Read More

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

तीन सभामंडपांची उभारणी ;१० हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था अमळनेर ( प्रतिनिधि): दि .२३ अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या बहिणाबाई…

Read More
error: Content is protected !!