Headlines

लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा : उन्मेषदादा पाटील

भडगावातील सभेत मविआ नेत्यांचा सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल भडगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील विकासासाठी आणि दडपशाहीला चाप लावण्यासाठी आहे. या निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवून महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले. ते भडगावात आयोजीत सभेत बोलत होते. याप्रसंगी…

Read More

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्रात नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण असतांनाच पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भात गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात आज अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता…

Read More

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

पुरुष व महिला एकेरीतील विजयी व उपविजयी खेळाडूंसह महाराष्ट्र कॅरम असो. चे सर्वश्री अजित सावंत, यतिन ठाकूर आणि केतन चिखले जळगाव | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ ते ६ मे दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य…

Read More

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल; मतदान केंद्रात केली EVM ची पूजा

बारामती दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

करण पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा संपन्न

जळगाव | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पाटील ह्यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. सभेसाठी मैदान लोकांनी संपूर्ण भरल्याने बरेच जण मैदानाबाहेर उभे होते. घोषणांनी परिसर दणानुन गेला होता. यावेळी उपस्थित लोकांमध्ये जबरदस्त उत्साह बघायला मिळाला. सुरुवातीला महाविकास…

Read More

केजरीवाल यांच्या अंतरीम जामिनावर आजही निर्णय नाही; पुढील सुनावणी ९ मे रोजी

नवी दिल्ली | दि. ७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अंतरीम जामीनावर सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या दीर्घ सुनावणीनंतरही कोणताही निर्णय घेतलेला नाही, या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. सध्या लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूका असल्याने त्यांना अंतरीम जामीन देण्याचा निर्णय होऊ शकतो असे संकेतही कोर्टाने…

Read More

सीआयएससीई बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा निकाल यंदाही १०० टक्के

जळगाव | दि. ६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला असुन यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा…

Read More

सीआयएससीई दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा निकाल १०० टक्के ; आदित्य सिंग प्रथम

सीआयएससीई बोर्ड दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १० वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला असुन यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनुभूती स्कूलमधून आदित्य सिंग हा ९५.४० टक्के गुणांसह प्रथम आला. त्याला गणित या…

Read More

…तर मी अभिनय क्षेत्र सोडणार ! कंगणा राणावतच्या चाहत्यांसाठी दुःखद खबर

मुंबई | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगणाने अनेक विषयावर भाष्य केले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणाला विचारण्यात…

Read More

अहमदाबादमधील ३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची इमेलद्वारे धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

अहमदाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्ब ब्लास्टची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ईमेलद्वारे मिळणाऱ्या या धमकींमुळे पोलिस यंत्रणा मात्र अलर्ट मोड आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास…

Read More

मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी ईडीची छापेमारी ;३० कोटीचे घबाड जप्त !

रांची | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनके ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज) धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील श्री महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच डॉ. विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी,…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीची हत्या ; पती फरार

मुंबई | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज) – येथील मलबार हिल परिसरातील शिमला नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या अजय वर्धम (वय ३८) याने पत्नी अंजली (वय ३६) हीची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात मृत अंजली वर्धमच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३४, ३०२ आणि…

Read More

जळगावात बनावट मद्य निर्मिती कारखान्यावर छापेमारीत सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. ४ मे, २०२४ रोजी एमआयडीसी भागातील के-१० सेक्टर मध्ये मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीवर छापा मारीत शितपेयाच्या नावाखाली सुरु असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला. या छापामारीत सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…

Read More

महाराष्ट्रात टीबी रुग्ण वाढल्याने औषधांचा तुटवडा दूर करावा : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

नाशिक | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील टीबी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एक हजाराच्यावर हे रुग्ण असण्याची शक्यता आहे. गेल्या २ महिन्यापासून शहरातील टीबी रुग्णांना औषधे देखील मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. आम्हाला, कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तसेच अन्य समाज घटकातील कुटुंबातील सदस्यांकडून राज्यातील वैद्यकीय उपचार केंद्रामधून क्षयरोगाचे औषधे उपलब्ध…

Read More
error: Content is protected !!