Headlines
Home » क्रीडा » दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयी ; इंग्लंड १०६ धावांनी पराभूत

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयी ; इंग्लंड १०६ धावांनी पराभूत

विशाखापट्टणम दि .५ ( प्रतिनिधी ) – विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. यजमान भारतीय संघाने हा सामना जिंकून इंग्लंडसोबत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता.

इंग्लंड संघाने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करतांना कालच्या ६७/१ धावसंख्येवरुन चौथ्या दिवशी खेळास सुरवात केली मात्र भारतीय गोलंदाजांचा मुकाबला करू न शकल्याने २९२ धावां वर त्यांचा डाव आटोपला , आणि भारताने १०६ धावांनी सामना जिंकला . जो रूट आणि बेन स्टोक्सच्या विकेट्स हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. क्रॉलीशिवाय इंग्लंडकडून या डावात अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. आता तिसरा सामना राजकोटमध्ये होणार आहे. आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने या डावात प्रत्येकी तीन बळी घेतले, तर मुकेश कुमार ,अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी एक एक घड़ी बाद केला . पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले आणि दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतक झळकावले.
सामनावीर जसप्रीत बुमराहला घोषित केले गेले . त्याने पहिल्या डावात ४५ धावा देत ६ तर दुसऱ्या डावात ४६ धावां देत ३ गड़ी बाद केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!