Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » पकिस्तानच्या राजकारणात खळबळ ; इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा

पकिस्तानच्या राजकारणात खळबळ ; इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली दि .३० ( प्रतिनिधी ) पाकिस्तानचे क्रिकेटपटू तथा माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इम्रान खान सत्तेत असताना पाकिस्तानच्या गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
आज दि. ३० रोजी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शिक्षा सुनावणी वेळी इम्रान खान, व शाह मेहमूद कुरेशी कोर्टरूममध्ये उपस्थित होते.
इम्रान खान यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे कारण पाकिस्तान मध्ये लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये न्यायालयाच्या या निर्णयामुळं अस्वस्थता पसरली आहे. इम्रान खान या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफनं पक्षानं (पीटीआय) या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पाकिस्तान इम्रान खान तसेच शाह मेहमूद कुरेशी यांच्या मागे उभा असुन हा निर्णय उच्च न्यायालयात अजिबात टिकणार नाही, असा विश्वास पीटीआयनं व्यक्त केला आहे.

इम्रान खान यांच्या पक्षावर येऊ शकते बंदी : शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी माध्यमांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घातली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं मागील वर्षी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला ‘बेहिशेबी निधी’ मिळाल्याच्या आरोप केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!