Headlines
Home » क्रीडा » ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार आदी उपस्थित होते.

पोलीस दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू, खेळाडू असून या पोलीस क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळातील असा विश्वास व्यक्त करुन राज्याच्या पोलीस दलातील खेळाडुंसाठी आवश्यक त्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत असून या प्रकल्पाला राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार आहेत. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच पोलीस दलातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्यासाठी साधारण १७ हजार पदांची भरती प्रक्रियाही सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना घरबांधणीसाठी पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!