एमएसआरटीसी च्या पाच हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांत होणार रूपांतर ; दरवर्षी सुमारे २३४ कोटींची बचत
मुंबई दि. ६ (प्रतिनिधी ) – महाराट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट…
