
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर
मुंबई ( प्रतिनिधि ) दि.२४ , लोकसभा निवडणुकीचा धुमाकुळ तसेच आचारसंहिता लागण्याआधी भाजप आणि मित्रपक्ष प्रणीत सत्ता असलेले सर्व मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या वारी करणार असल्याचे समजते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. अयोध्येतील मंदिरात दि २२ रोजी…