जळगाव
जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न
सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस…
लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा : डॉ. अण्णासाहेब टेकाळे
ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा कांताई सभागृह येथे संपन्न जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठाविषयीचे आचरणही बदलत आहे. त्यामुळेच सरकारसोबत समाजातील प्रत्येक घटकाने वृद्धांविषयी आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखली पाहिजेत, गाव तेथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक…
५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या आंतर संस्था सांघिक विजेतेपद गटात जैन इरिगेशनच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दैदीप्यमान अशी कामगिरी करताना दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले. नवी दिल्ली येथे दि. १७ ते २१ मार्च दरम्यान संपन्न झालेल्या जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या संघाचा…
के.सी.ई च्या पी.जी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा व उद्योजकता विकासाचे धडे
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पी. जी. महाविद्यालयात विज्ञानातील जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांच्या उद्योजकता आणि बौद्धिक संपदा अधिकार विकास या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे पार पडले. चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा…
जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता – मुक्या जीवांसाठी तत्परता!
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले. क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल…
जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, ‘पाणी’ हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे. मात्र, हे वरदान आपण जपले नाही तर भविष्यात भीषण संकट उभे राहू शकते. म्हणूनच जलसंधारण, पाणी पुनर्वापर, टाकाऊ…
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करणवाल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा…
एम.पी.एड. अभ्यासक्रम प्रवेशासाठी ८४ विद्यार्थ्यांनी दिली मैदानी परीक्षा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे घेण्यात आली. सदर सामायिक परीक्षा ही एम.पी.एड. या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी होती. एम.पी.एड या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम अर्जाची छाननी व आय कार्ड तपासण्यात आले. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने मैदानी परीक्षा…
पाटबंधारे कामाअंतर्गत बिलांच्या चौकशीची मागणी प्रकरणात आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाटबंधारे विभागात कामे न करताच बिले काढले जात असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन रंधे हे सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील हातनूर, वाघूर तसेच धरणाचे देखभाल दृष्टीची कामे करण्याच्या नावाखाली ठेकेदार काम न करता बिले काढून…
जैन हिल्स ला पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांच्या ‘मसाला समूह’ कार्यशाळा संपन्न
दीपप्रज्ज्वलन करुन उदघाटन करताना अशोक जैन, (डावीकडून) समाधान पाटील, प्रतिभा शिंदे, आयुष प्रसाद, धांडे, जि.प. सीईओ मिनल करनवाल, अरुण पवार जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी…
केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात अंतरंग २ के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अंतरंग २के२५ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी स्नेहसंमेलन म्हणून व्यसपीठ उपलब्ध केले आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी स्नेहसंमेलनाच्या …
सर्व सामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांनी बघितले संसद, राष्ट्रपती भवन ; रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटचा स्तुत्य उपक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या ‘सपने हुए सच’ या दुसऱ्या वर्षातील अनोख्या उपक्रमा अंतर्गत शहरातील श्रमिकांच्या रहिवासी परिसरातील पाच शाळांमधील १५ विद्यार्थ्यांना दिल्लीसह आग्रा, मथुरेची सहल घडली. दिल्लीतील जुने व नवे संसद भवन, राष्ट्रपती भवन, कुतुब मिनार, लोटस टेम्पल, इंडिया गेट, आग्रा येथील किल्ला आणि मथुरेतील मंदिर तसेच विविध…
मू.जे. महाविद्यालयात “विशेष व्याख्यान आणि संशोधन कार्यशाळा” संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव’ आणि ‘प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र’यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाच्या न्यू कॉन्फरन्स हॉल येथे ‘विशेष व्याख्यान’ आणि ‘संशोधन कार्यशाळा’ यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळचे उद्घाटन मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ.भूपेंद्र केसुर यांनी केले. पहिल्या सत्रात आय.आय.टी. मंडी, हिमाचल प्रदेश येथील संशोधक विद्यार्थी राज शिरोडे यांचे विशेष व्याख्यान झाले….
विकसित भारत तसेच माय भारत पोर्टल रजिस्ट्रेशन विषयी चर्चासत्र संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट स्पर्धेबद्दल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे तसेच विभागीय संचालक प्रा.डॉ….
हतनुर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळासमोर सामाजिक न्यायार्थ आमरण उपोषण !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत हतनूर धरणापासून यावल रावेर तसेच चोपडा तालुक्यात गेलेले हतनूर वर पाट फुटी बाबत व इतर काही कारणास्तव चौकशी व कार्यवाही होण्यासाठी केलेल्या तक्रार अर्जा च्या मुद्द्यांसंबंधी समाधान न झाल्याने नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन रंधे हे सोमवार दि.१७ रोजी तापी पाटबंधारे महामंडळ…
