जळगाव
मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभावाना होणार आहे. तरी भाविकांनी…
“खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे ती आत्मसात करा” : मंत्री गुलाबराव पाटील
६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात भव्य उद्घाटन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा भव्य शुभारंभ जळगाव शहरात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूं सहभागी झाले आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे….
माजी सैनिक किशोर पाटील यांचा शेगाव येथे सत्कार
शेगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी l सुमित पाटील : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाशिक विभागाचे मा. विभागीय उपाध्यक्ष किशोर पाटील यांचा शेगाव येथे संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. संघटनेच्या राज्य कार्यकारणीत कार्यरत असताना संघटनेचा प्रचार, प्रसार व विस्तार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. संघटनेच्या…
२३ व्या बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबला वादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व.वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल….
शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने ; कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय आज कथक नृत्यविष्कारातुन जळगावकरांनी अनुभूवली. अनिरुद्ध आयठल याने शास्त्रीय व उपशात्रीय गायनातुन तरणा ‘तोम ता देरेना’ सादर करून श्रोत्यांच्या हृदयात कायमची जागा कोरली. ‘ध्यास…
ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल मधे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महिलांसाठी अतुलनीय कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सावित्रीबाईंनी ब्रिटिश राजवटीत पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली….
२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात ; आज शास्त्रीय गायनासह कथक नृत्याची मेजवानी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल ‘गावे गुणीजन’ तर…
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’मध्ये सहभागी सदस्यांसमवेत गिरीश कुळकर्णी, डॉ. झाला व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या…
पिंप्राळा नगरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनात शिकण्याची जिद्द असून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू शकतात हे बाब डोळ्यासमोर ठेवून जळगाव शहरात गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा प्रदिप पाटील यांच्या वतीने विद्यार्थी विकास केंद्रातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले….
पाळधीत संचारबंदी लागू ; रस्त्यावर दिसल्यास कारवाई, जनतेने शांतता ठेवावी अफवांना बळी पडू नये : पोलिस प्रशासन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवार दि.३१ डिसेंबर रोजी रात्री दोन गटात संघर्ष होऊन काही दुकानांची तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार गावातून काही वाहने जात असतांना, त्यातील एका वाहनाचा कट लागल्याने, या वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ…
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वसंत बहार २०२४’ – सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे वसंत बहार हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी ग्रंथपाल अलका नेहते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.अँड….
मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी
जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते. कार्यक्रमास…
के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात व्यवस्थापन विभागातर्फे दि.२६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ट्रेजर हंट, फन फेअर आणि बिझनेस क्विझ, ऍड-म्याड शो, या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा होता. या…
आपला हा जन्मच महान कार्य करण्यासाठी झाला आहे त्यामुळे संधी गमावू नका : जीवन महाजन यांचे प्रतिपादन
जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात व्याख्याते, योग आणि अध्यात्माचे गाढे अभ्यासक, कवी, तथा लेखक जिवन महाजन यांचे “गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस.एन. पाटील, पर्यवेक्षक बी.एन….
धक्कादायक : घरात घुसुन पत्रकार आणि कुटुंबावर जीवघेणा भ्याड हल्ला !
कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दिपक अमृतकर यांच्या घरावर १५ ते २० लोकांनी अचानकपणे जीवघेणा हल्ला चढवून पत्रकार दिपक अमृतकर, व त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेबाबत मिळालेल्या माहीतीनुसार भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दिपक अमृतकर हे आपल्या कुटुंबासह…
