Headlines

दिपक जाधव

‘एपिक’ फोटो प्रदर्शनाची सुरवात ; दृष्य कथा, बोलक्या गोष्टींसह चित्रांचा संग्रह जळगावकरांसाठी प्रेरणादायी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो प्रदर्शन पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये आज दि. १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आयोजीत केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन फीत सोडून व दीपप्रज्वलनाद्वारे झाले. याप्रसंगी शकुंतला चावला, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, तुषार…

Read More

‘विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र’ ; ओरियन स्टेट बोर्ड शाळेचा निवडणूक जनजागृतीसाठी उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, अभियंता प्रकाश पाटील, योगेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. आज दि.१३…

Read More

रेडियो मनभावन 90.8 एफ.एम कडून विद्यार्थ्यांसाठी रेडियो जॉकी सप्ताहाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बालदिनाचे औचित्य साधून खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालयात रेडियो मनभावन 90.8 एफ.एम ने लहान विद्यार्थी मित्रांचा रेडियो जॉकी सप्ताह सुरू केला आहे. दि.१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सदर सप्ताह साजरा होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि पर्यावरण यावर संवाद साधायचा आहे. बालदिनी…

Read More

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात व्यसनमुक्ती आणि मतदान जनजागृती वर कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी जळगाव विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ड्रग अब्युज या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी समांतर विधी सहाय्यक तसेच काउन्सलर भारती ज्ञानेश्वर कुमावत आणि ॲडवोकेट ऐश्वर्या मंत्री हजर होते. भारती कुमावत यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संबंधी मार्गदर्शन केले. व्यसनाचे वेगवेगळे प्रकार यावर प्रकाश टाकून…

Read More

संत नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीचा कार्यक्रम आज भाजप कार्यालय वसंत स्मृती जळगाव येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. याप्रसंगी त्यांनी संत नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या महान कार्याबाबत…

Read More

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य : डॉ. अनिल काकोडकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे…

Read More

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस ॲकडमी यांच्या सहकार्यातून दि.८ ते १० नोव्हेंबर असे तीन दिवस हा सेमिनार असणार आहे. जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ…

Read More

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा ; जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिनला विजेतेपद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर तर्फे दि. ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या पुरूष एकेरी कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने जैन इरिगेशनच्याच नईम अन्सारीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपदासह रोख रुपये ७०००/- आणि चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. नईम अन्सारी यास रोख रुपये…

Read More

अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट ! जळगावातील थरारक घटना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) श. प्र. संदीप सोनवणे। शहरातील इच्छादेवी चौक परिसरात वाहनात अवैधरीत्या गॅस भरत असतांना सिलेंडरचा स्फोट झाल्याने लगलेल्या आगीत ओमनी गाडी व संबंधित दुकान जळून खाक झाले. या दुर्घटनेत १० जण जखमी झाले आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरुन याठिकाणी असलेली बुलेट दुचाकी चक्क आकाशात फुटबॉलसारखी उडाली. या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली…

Read More

ज्ञानभारती फाउंडेशन चा भाऊबीज निमित्त एक आनोखा उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वि.प्र.संदीप सोनवणे | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ‘आश्रय माझे घर’ मतीमंद मुलांचे आश्रयस्थान सावखेडा येथे मुलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. अतिशय आनंददायी वातावरणात मुलांना ओवाळुन गोडधोड खाऊ घालण्यात आले. तसेच मुलांना कै.श्री.छगनराव परशराम नाईक आणि कै.सौ.रेवती छगनराव नाईक यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ भाऊबीजेच्या मंगल पर्वावर मसाला डोसे, चॅयनिज राईस, चटणी तसेच…

Read More

‘पाडवा पहाट’ या मैफिलीत सुरांची अतिशबाजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सालाबादप्रमाणे यावर्षी पण स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित दिवाळी ‘पाडवा पहाट’ या कार्यक्रमाचे २३ वे पुष्प आज रोजी महात्मा गांधी उद्यानात गुंफले गेले. या कार्यक्रमास कैलासवासी नथ्थू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वरुण नेवे यांनी प्रतिष्ठानच्या…

Read More

महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी शितल चिंचोरे यांची नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : म्हसावद येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शितल दिपक चिंचोरे यांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) महिला आघाडी लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रातील जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शीतल चिंचोरे…

Read More

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत दानिश तडवी प्रथम ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रावेर ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. वयोगट १४,१७, आणि १९ वर्षां आतील मुलांच्या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो…

Read More

इनरव्हील क्लब जळगाव यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इनरव्हील क्लब जळगाव च्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, वाईस प्रेसिडेंट डॉ. मयूरी पवार, प्रोजेक्ट चेयरमैन प्रतिभा जैन व क्लब चे इतर सदस्य यांनी रावेर जवळील आदिवासी पाडा येथे जाऊन तेथील जवळ जवळ ३० आदिवासी कुटुंबाला दिवाळीसाठी साहित्य वाटप करून मदत केली. यावेळी प्रतिभा जैन यांच्याकडून किराणा साहित्य,…

Read More

राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे : जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील जिल्हा कोषागार, कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना आपले हयात प्रमाणपत्र १ नोव्हेंबर २०२४ पासून बँकेमार्फत सादर करावे लागणार आहे..जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी याबाबतीत प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखेत हयात प्रमाणपत्राच्या याद्या पाठविण्यात आलेल्या…

Read More
Top
error: Content is protected !!