जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांचेवतीने समाज शिरोमणी संत गाडगेबाबा यांच्या नवीन पुतळ्याचा आगमन सोहळा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला उपनगरातील कालिंका माता मंदिर येथे माजी महापौर शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, पियूष कोल्हे, संदिप सोनवणे, हेमराज परदेशी, अमर परदेशी यांनी सात फूट उंचीच्या संत गाडगेबाबा यांच्या बैठे मनमोहक पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण केले.

यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. तेथून सवाद्य शोभायात्रेेस सुरवात झाली. शोभायात्रेत जिल्हा व शहर परदेशी समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी असंख्य महिला व पुरुष समाज बांधव तसेच जळगाव जिल्हा धोबी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव यांची उपस्थिती होती. आगमन सोहळा आयोजनासाठी आयोजक यशाची चव्हाण व जळगाव शहर परदेशी धोबी मंडळाचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले शोभायात्रेत असंख्य समाज बंधू भगिनी आकर्षक फेटे घालून सहभागी झाले होते.
