Headlines
Home » जळगाव » १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना ठरवण्यात आल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील योजनांची सद्यस्थिती आणि आगामी कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करून शासनाच्या योजना जलद आणि प्रभावीपणे पोहोचवण्यावर यावेळी भर देण्यात आला.

या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, विभागीय प्रमुख अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!