जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, के.सी.ई. सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील, कवियित्री बहिणाबाई चौधरीउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन, आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.पवित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. शरद चव्हाण, स्नेहसंमेलन सचिव मनीष चव्हाण, क्रीडा सचिव विशाल पाटील हे होते.
सदर कार्यक्रमास डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पाहूजा, प्रा. जी.व्ही. धुमाळे, प्रा. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, डॉ. विजेता सिंग, प्रा. अमिता वराडे, प्रा. बी.एस. पाटील, डॉ. ज्योती भोळे, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. नितीन मटकरी, प्रथम न्यायदंडाधिकारी नरेश बारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संदीप गावित यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या करिअर साठी कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यानंतर डॉ. पवित्रा पाटील, ॲड. प्रमोद पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी इत्यादींचा विशेष सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रथम न्यायदंडाधिकारी नरेश बारी यांचा पीएच. डी. प्राप्त झाल्याने सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल गायकवाड, पुष्कर पाटील, वैष्णवी पाटील आणि दीपिका घैसास यांनी केले. आभार मनीष चव्हाण यांनी मानले.
