Home » जळगाव » शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात रंगली सुरांची अविस्मरणीय मैफिल

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात रंगली सुरांची अविस्मरणीय मैफिल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील स्वरगंधर्वाचा शोध घेत मागील चार वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन शशिकांत वडोदकर ( प्रशासकीय अधिकारी व के.सी.ई. सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक) व शिरीषभाई गुजराथी (संगीत विशारद व समन्वयक ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे ), देवेंद्र गुरव (संगीत दिग्दर्शक ) व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, धनश्री फालक, नरेंद्र पालवे (पर्यवेक्षक) यांच्याहस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

सदरील स्पर्धेत जिल्ह्य़ातील ३७ शिक्षकांनी सहभाग नोंदवून भावगीत, भक्तीगीत, देशभक्तीपर गीत,गवळण, गझल, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

स्पर्धेचा निकाल
स्पर्धेत प्रथम क्रमांक महेंद्र अरुण साळुंखे, द्वितीय क्रमांक राधिका सचिन करोडपती, तृतीय क्रमांक गणेश भगवंत देशमुख तर उत्तेजनार्थ प्रविण गांधिले, व जफर अकबर शेख विजेते ठरले. सर्व विजेत्या स्पर्धकांना उषा दिनकर वडोदकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक देण्यात आले.

पारितोषिक वितरण नितीन भास्कर ( चित्रपट निर्माते व दिग्दर्शक), शरद पाटील (चित्रपट निर्माते व दिग्दर्शक), मा.प्राचार्य. अशोक राणे (शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव), मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पराग राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणिता झांबरे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!