Home » जळगाव » एस एस मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

एस एस मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चे उद्घाटन निवृत्त प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी.युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.शरद चव्हाण, स्नेहसंमेलन सचिव मनीष चव्हाण हे होते. यावेळी कार्यक्रमास डॉ.रेखा पाहूजा, प्रा. जी.व्ही. धुमाळे, प्रा.योगेश महाजन, डॉ.अंजली बोंदर, डॉ. विजेता सिंग, प्रा.अमिता वराडे, प्रा. बी.एस. पाटील, डॉ.ज्योती भोळे, प्रा.स्वाती लोखंडे, प्रा.नितीन मटकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. व्ही.आर. पाटील यांनी विद्यार्थी जीवनातील स्नेहसंमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच वकिली व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. बी.युवाकुमार रेड्डी यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा पट मांडला. विद्यार्थिनी दीपिका घैसास हिने गणेश स्तवन पर कथक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती जैन आणि दीपिका घैसास यांनी केले. आभार प्रा.शरद चव्हाण यांनी मानले. आज दिवसभरात रॅम्प वाक, सीन रिक्रीएशन, ऑर्केस्ट्रा इत्यादी स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. परीक्षक म्हणून ॲड.अमित सोनवणे, ॲड.अभिजित रंधे, ॲड.निलेश जाधव, माही सुर्वे, मानसी शर्मा, संजना मोरे, भारती रंधे, ऋतुजा चव्हाण, हे लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!