Headlines
Home » जळगाव » ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन 

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन 

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीन्वये दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्णाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी येत्या ३० जानेवारी रोजी जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, पारोळा या तालुक्यात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता  होणाऱ्या सभेस सर्व नागरिकांनी सदर सभेस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!