Home » जळगाव » के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप

के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि२१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल आयोजित “के.सी.ई.एस.क्रीडा महोत्सव २०२५” च्या समारोप प्रसंगी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, के. सी. ई. सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील व सहसचिव ॲड. प्रविणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, के. सी.ई. सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ सदस्य भालचंद्र पाटील, डॉ. शिल्पा बेंडाळे, के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मू.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजित पाटील, तसेच के.सी.ई. सोसायटीच्या विविध विद्याशाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदृस्तीसाठी खेळ महत्वाचे आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळ, सांस्कृतिक, सामजिक आणि राजकीय जाणीवा उच्च प्रतीच्या असतात त्यामुळे ते सगळ्यात पुढे असतात असे मनोगत यावेळी मांडले.

“के.सी.ई.एस.क्रीडा महोत्सव २०२५” यंदा पहिल्या वर्षी १२ क्रीडा प्रकारात साडेचार हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला.यात विजयी विद्यार्थ्यांना सुवर्ण, सिल्वर आणि ब्रांझ पदक देऊन १४०० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.यावेळी डॉ. युवाकुमार रेड्डी, डॉ. बी. व्ही. पवार, डॉ. के. बी. महाजन , डॉ. संजय सुगंधी, प्रा. राजेंद्र ठाकरे, प्रा. के. जी. सपकाळे, प्रा. सुषमा कांची व प्रा. प्रणिता झांबरे उपस्थित होते. सदर स्पर्धा ह्या एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समिती सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी मांडले. या कार्यक्रमात एकूण १४०० विद्यार्थी खेळाडूंचा त्यांच्या स्पर्धेतील वैयक्तिक कार्यानुसार अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्य पदकाने सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धेतील चॅम्पियनशिप ट्रॉफी अनुक्रमे प्री प्रायमरी विभाग (नर्सरी ते सिनिअर के.जी.), शालेय प्राथमिक विभाग (इयत्ता १ ते ४), शालेय माध्यमिक विभाग (इयत्ता ५ ते ९), महाविद्यालयीन विभाग (इयत्ता ११ ते पोस्ट ग्रज्युएशन) या प्रमाणे देण्यात आली

■ स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

  1. चॅम्पियनशिप ट्रॉफी प्री-प्रायमरी विभाग- के.सी.ई.एस. किल बिल बालक मंदिर
  2. चॅम्पियनशिप ट्रॉफी शालेय प्राथमिक विभाग – के.सी.ई.एस. ओरिऑन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल
  3. चॅम्पियनशिप ट्रॉफी शालेय मध्यमिक विभाग – के.सी.ई.एस. ओरिऑन स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल
  4. चॅम्पियनशिप ट्रॉफी महाविद्यालयीन विभाग – के.सी.ई.एस. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय
  5. जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी – के.सी.ई.एस. ओरिऑन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल
  6. उत्कृष्ठ पथसंचलन ट्रॉफी – भूमिका शाम गरुड (के.सी.ई.एस. जी.पी.व्ही.पी. स्कूल)

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!