Headlines
Home » महाराष्ट्र » मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागातील योजनांचा घेतला आढावा

मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागातील योजनांचा घेतला आढावा

मुंबई (वास्तव पोस्ट ) : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.

यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘मिशन वात्सल्य’, ‘मातृवंदना योजना’, ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!