Home » जळगाव » ‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत मू.जे. महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत मू.जे. महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव (वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक ग्राम वंजारी खपाट येथे झाले. शिबिराचा समारोप कार्यक्रमासाठी मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे हे अध्यक्ष म्हणून तसेच निरोप समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे व श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर किती महत्त्वाचे आहे व यामधून विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते व ते सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजाच्या व देशाच्या विकासासाठी पुढे येतात असे प्रतिपादन केले.

सदर शिबिरामध्ये १ जानेवारी ते ७ जानेवारी या दरम्यान नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्त गट तपासणी तसेच थेलेसिमिया आजारावर मार्गदर्शन, वनराई बंधारा,मधुमेह या विषयावर वक्त्यांनी आपले मार्गदर्शन केले तसेच सौर ऊर्जा काळाची गरज, डिजिटल साक्षरता, ग्रामविकास माझी वसुंधरा, बालविवाह हक्क व कायदे ,मतदान जनजागृती, जागो ग्राहक जागो, सायबर सिक्युरिटी व अन्नपरीक्षा सुरक्षा जनजागृती या विषयावर प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले .

समारोपच्या दिवशी सर्वोत्तम स्वयंसेवक मुलगा व सर्वोत्तम स्वयंसेविका मुलगी यांची निवड करण्यात आली. बेस्ट स्वयंसेवक म्हणून राहुल महाजन तर बेस्ट स्वयंसेविका विद्यार्थीनी म्हणून केतकी शिंपी यांची निवड करण्यात आली. तसेच बेस्ट ग्रुप शूरवीर या ग्रुपची निवड करण्यात आली या सात दिवशी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पथनाट्य घेण्यात आली. गावकऱ्यांसाठी समाज प्रबोधन कार्यक्रम तसेच पथनाट्य घेण्यात आली व त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

शिबिरामध्ये विद्यापीठाच्या अनेक मान्यवरांनी येऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, जिल्हा समन्वय डॉ. दिनेश पाटील विभागीय समन्वयक डॉ. राजू गवारे व इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या हिवाळी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य स.ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विशाल देशमुख कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना तसेच डॉ.जयश्री भिरुड महिला कार्यक्रम अधिकारी व डॉ. अखिलेश शर्मा सहाय्य कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तसेच या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावाचे सरपंच मनीषा महाजन, पोलीस पाटील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक भिकन पाटील यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!