Home » जळगाव » पिंप्राळा नगरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पिंप्राळा नगरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनात शिकण्याची जिद्द असून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू शकतात हे बाब डोळ्यासमोर ठेवून जळगाव शहरात गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा प्रदिप पाटील यांच्या वतीने विद्यार्थी विकास केंद्रातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

शहरातील गरीब वस्तीमधील राहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना वर्षा पाटील व प्रदिप पाटील हे मागील आठ वर्षांपासून मोफत शिक्षण देण्याचे कार्य आपल्या राहत्या घरून करीत आहेत. यात विद्यार्थ्यांना गणित विषयातील सोप्या पद्धती, पाढे, सामान्य ज्ञान याबाबत मार्गदर्शन करत असतात.

जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही, तसेच पालक विद्यार्थ्यांना क्लास लावू शकत नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा मुलांना वाचन, लेखन, गणन शिकवण्याचे कार्य वर्षा पाटील व प्रदिप पाटील परिवार करीत आहे. स्वतःच्या कमाईतून आलेल्या पैशातून हे कुटुंब या विद्यार्थ्यांवर खर्च करीत असतात. लवकरच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्थाश्रम करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!