जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात व्यवस्थापन विभागातर्फे दि.२६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत ट्रेजर हंट, फन फेअर आणि बिझनेस क्विझ, ऍड-म्याड शो, या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा होता.
या कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यात कार्पोरेट कल्चर मध्ये काम करावयाचे आहे. त्या दृष्टीकोनातून सार्वभौम विकास होणे म्हणजे, स्टेज डेअरिंग, मुलाखत कौशल्य, संभाषण कौशल्य, आवश्यक विचार क्षमता, यांचे अवलोकन होणे गरजेचे आहे, असे सरांनी सांगितले. त्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी होणे महत्वाचे आहेत.

ऍड-म्याड शो मध्ये जाहिरात कशी घ्यावी, लोकांना कसे आकर्षित करावे, कायद्यांच्या नियमांना अनुसरून कोणत्या जाहिराती देता येतात या सर्व गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना स्पर्धेमुळे मिळाले.
या कार्यक्रमानंतर ट्रेजर हंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग्य मार्ग कसा काढावा व उद्दिष्ट स्थळी कसे पोहोचता येईल, कोणत्या योग्य व्यक्तीची मदत घेता येईल व आपणास यश कसे मिळेल, या सुप्त गुणांचा वाव विद्यार्थ्यांना या स्पर्धेत शिकता आला.
दि.२७ रोजी महाविद्यालयात फन फेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ ठेवले होते. या पदार्थाच्या रुचकर, स्वादिष्ट चविचा आनंद प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पन्न आणि उत्पादन खर्च काढणे व होणारा तोटा कसा कमी करण्यात येईल व नफा कसा वाढवता येईल याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले.
बौद्धिक चालनेच्या दृष्टीकोनातून बिझनेस क्विझ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढावी, स्पर्धा परीक्षेत सहभाग वाढवावा तसेच ज्ञान हे किती महत्वाचे आहे, हे पटविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रा. हर्षा देशमुख, प्रा.डॉ. वीणा भोसले, प्रा.शेफाली अग्रवाल, प्रा.डिगंबर सोनवणे, प्रा.कोमल जैन, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा.तनिया भाटिया, प्रा.गणेश पाटील, प्रा.श्रुतिका घरडे, प्रा.हेमंत धनधरे, प्रा.रेवती पाटील व देवेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले.
