Home » महाराष्ट्र » चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या ; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये

चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या ; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये

पुणे ( वास्तव पोस्ट ) : राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, आज शुक्रवार दि.२७ रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजगुरूनगरमध्ये एका अधेड हैवानाने चिमुकल्या दोन सख्या बहिणींवर अत्याचार करून दोघींची अमानुषपणे हत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र रोष दिसून येत आहे. नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात काय माहीती समोर आली, याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी घेतल्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट त्यांनी घेतली आहे.

दरम्यान या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याची कबुली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे दिली. पिडित कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल, मात्र या मदतीमुळे त्या दोन्ही चिमुकल्या परत येणार नाहीत. म्हणून मुळतः ही विकृतीच ठेवण्याची गरज आहे. यासाठी सरकार कठोर पावले उचलेल, असा विश्वास गोऱ्हेनी व्यक्त केला.

नराधमाची पार्श्वभूमी बघता तो परप्रांतीय असून आता यापुढे परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे. त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरावा, असेही गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हायला हवी, यासाठी आम्ही ही पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने ठेवलीत बंद

राजगुरूनगरमध्ये सकाळ पासून काही व्यापाऱ्यांनी स्वतःहुन दुकान बंद ठेवली आहेत. चिमुरड्या बहिणींवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने काही प्रमाणात पडसाद उमटत आहेत. आरोपीला तातडीनं फाशी द्यावी अशी मागणी केली जातीये. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्यापारी दुकानं बंद ठेवत आहेत. इतरांनी ही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विविध संघटना आवाहन करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!