Home » राष्ट्रीय » नोकरीसाठी केलेल्या अर्जावर १८% जीएसटी लागणार ! सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतेय : खा. प्रियंका गांधी वाड्रा

नोकरीसाठी केलेल्या अर्जावर १८% जीएसटी लागणार ! सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतेय : खा. प्रियंका गांधी वाड्रा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : देशात बेरोजगारांची संख्या वाढतच चालली असून बेरोजगार जास्त आहे आणि त्यामानाने नोकऱ्या कमी आहेत. यामुळे तरुणांना आपल्या प्रतिभा किंवा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. एका पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली तरी हजारो अर्ज येतात. या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही तरुणांची पहिली पसंती आहे.

दरम्यान बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे असं अनेकांना वाटते. पण त्याऐवजी नोकरीसाठी अर्ज केल्यावर सरकार १८% जीएसटी आकारत आहे. या प्रकरणावर वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. भाजप तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण परीक्षा फॉर्मवर १८% जीएसटी आकारून देशातील तरुणांच्या जखमेवर नक्कीच मीठ चोळत आहे. अग्निवीरसह प्रत्येक सरकारी नोकरीच्या फॉर्मवर जीएसटी वसूल केला जात आहे. फॉर्म भरल्यानंतर सरकारच्या अपयशामुळे पेपर फुटतो आणि भ्रष्टाचार झाला तर तरुणांचा हा पैसा बुडतो.

देशभरातून तरुणांचा पाठिंबा :

नोकरी मिळत नसल्याने देशातील बेरोजगार तरुण आधिच अक्षरशः वैतागला आहे. आपली बेरोजगारी दूर करण्यासाठी विविध परीक्षा देऊन नोकरी मिळविण्यासाठी झटत असताना त्याला परीक्षा शुल्कासह जीएसटी भरण्याची वेळ आल्याने देशातील बेरोजगार तसेच विद्यार्थ्यांकडून सदर घटनेचा निषेध व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान खासदार प्रियंका गांधी यांनी अधोरेखीत केलेल्या या अन्यायाला देशभरातून पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बनविले उत्पन्नाचे साधन :

तळागाळातील पालक दिवसरात्र काबाडकष्ट करतात, मेहनतीने पैसे जमा करून आपल्या मुलांना शिकवतात. मुले परीक्षेची तयारी करतात, पण भाजपा सरकारने त्यांच्या स्वप्नांनाही आपल्या उत्पन्नाचे साधन बनवले आहे, असे प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रियंका यांच्या या पोस्टला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषतः तरुण वर्ग या मुद्यावर आपल्या विविध प्रतिक्रिया देत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!