जळगाव ( वास्तव पोस्ट ) : परभणी संविधान प्रत विटंबना करणाऱ्यास फाशीची शिक्षा व्हावी व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत संशयास्पद मृत्युप्रकरणी घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी असे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय दलित पँथर्सचे महाराष्ट्र सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे जिल्हाध्यक्ष राजू महाले जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरीकर जिल्हा सल्लागार रवी सोनवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
