Headlines
Home » महाराष्ट्र » डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज निषेध

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच दिन दुबळ्यांचे कैवारी तथा समस्त मानवाला हक्क आणि अधिकार प्रदान करून त्याचे आयुष्य स्वर्गापेक्षा अधिक सुंदर बनवणारे विश्वरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मंगळवार दि.१७ रोजी अमित शाह यांनी भर संसदेत अपमानजनक वक्तव्य केल्याने संपूर्ण देशात अमित शाह यांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. ठीक ठिकाणी शाह यांच्या पुतळ्याचे दहन तसेच त्यांच्या प्रतिकृतीला चप्पल मारो आंदोलन केले जात आहे. विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून ताबड़तोब माफी मागावी आणि केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज गुरुवार दि.१९ रोजी दुपारी ठीक २ वाजता मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) येथे सर्व लोकशाहीवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेच्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, आणि अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कडून करण्यात आले आहे. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!