Home » राष्ट्रीय » शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी येथे देणार भेट; ईव्हीएम विरोधात लाँग मार्चची तयारी !

शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी येथे देणार भेट; ईव्हीएम विरोधात लाँग मार्चची तयारी !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : जेष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला गती देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी मारकडवाडीला भेट देतील, तर राहुल गांधी तिथून ईव्हीएम विरोधी मोर्चा काढतील. पदाधिकारी व अनेक गावकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरद्वारे चाचणी मतदान घेण्याचा वाद अधिकच चिघळला आहे.

दरम्यान निवडणुकांमधील पारदर्शकतेसाठी ईव्हीएमवर आक्षेप घेत चाचणी म्हणून गावकऱ्यांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होते. प्रशासनाकडून सदर कार्यपद्धतीस विरोध दर्शविण्यात आला व त्यांच्या या मतदान प्रक्रियेच्या दिवशी जमावबंदी आदेश लागू करून याप्रकरणी पोलिसांनी माळशिरसचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार उत्तम जानकर यांच्यासह शंभराहून अधिक ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया दिली असून, पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणाऱ्या #EVM विरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही. परिणामी संपूर्ण राज्यात “मारकडवाडी पॅटर्न” राबवायला सुरुवात होईल, याची मला खात्री आहे. येत्या रविवारी आदरणीय पवार साहेब मारकडवाडी ला भेट देणार आहेत.राहुल गांधी देखील ईव्हीएम विरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या EVM विरोधातील ही ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार एल्गार होवो…! असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!