Home » जळगाव » के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात म्युझिक क्लब स्थापन करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर. सुगंधी यांचे हस्ते म्युझिक क्लबचे उद्घाटन करण्यात आले. क्लबची जबाबदारी प्रा. रेवती पाटील व देवेंद्र पाटील यांना सोपवण्यात आली.

उद्घाटन प्रसंगी डॉ. सुगंधी सरांनी संगीताचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आयुष्यात प्रत्येक वळणावर आणि क्षणा-क्षणाला संगीत आपल्याला साथ देत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःखाचे क्षण येत असतात, अशा तणावातून बाहेर पडण्यास संगीत हे मुख्य भूमिका निभावत असते. सर्व विद्यार्थ्यांनी म्युझिक क्लब मध्ये सहभाग नोंदवावा व असलेल्या सुविधेचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे यावेळी त्यांनी सांगितले. संगीत हे माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगून संगीत ऐकल्याने मन प्रसन्न व ताजे तवाने होते असे डॉ. सुगंधी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!