Home » होम » स्वीप उपक्रम सत्कार समारंभात मु जे महाविद्यालया च्या रेडिओ मनभावनला गौरविले

स्वीप उपक्रम सत्कार समारंभात मु जे महाविद्यालया च्या रेडिओ मनभावनला गौरविले

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात SVEEP उपक्रमांतर्गत माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा नियोजन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्राचार्य संजय भारंबे याना सन्मानित करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत वाढलेला प्रतिसाद याकरिता विविध माध्यमानी जनजागृती करण्यात आली होती. केसीई सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या रेडिओ मनभावन यांनी रेडिओ आणि चित्रफीत बनवून जनजागृती केली या कार्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्राचार्य संजय भारंबे, रेडिओ मनभावन संचालक अमोल देशमुख, आरजे नीलम पाटील, आरजे प्रियंका बारी यांना सन्मानित केले.

यावेळी समाजकल्याण उप आयुक्त योगेश पाटील,मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!