Headlines
Home » जळगाव » डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात व्यसनमुक्ती आणि मतदान जनजागृती वर कार्यक्रम

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात व्यसनमुक्ती आणि मतदान जनजागृती वर कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी जळगाव विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ड्रग अब्युज या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी समांतर विधी सहाय्यक तसेच काउन्सलर भारती ज्ञानेश्वर कुमावत आणि ॲडवोकेट ऐश्वर्या मंत्री हजर होते.

भारती कुमावत यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संबंधी मार्गदर्शन केले. व्यसनाचे वेगवेगळे प्रकार यावर प्रकाश टाकून त्यांनी व्यसनापासून आजची युवा पिढी कशी स्वतःला दूर ठेवू शकते याबद्दल प्रबोधन केले. तसेच मतदानाचा घसरता टक्का पाहून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी मतदान करण्याविषयी जनजागृती केली. आपल्या एका मत किती अमूल्य आहे. याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले. लोकशाहीत मताधिकार्‍याला असलेले महत्त्व वर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला.

शेवटी मतदानासंबंधीची प्रतिज्ञा घेऊन आणि नशा मुक्तीची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नयना महाजन (झोपे), उपस्थित होत्या. कार्यक्रमचे सुत्रसंचालन डाॅ.ललीता कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!