Headlines
Home » जळगाव » संत नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

संत नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीचा कार्यक्रम आज भाजप कार्यालय वसंत स्मृती जळगाव येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.

याप्रसंगी त्यांनी संत नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या महान कार्याबाबत माहिती दिली व नामदेव महाराजांनी ७९९ वर्षांपूर्वी पंढरपूर ते घुमान पंजाब पर्यंत पायी वारी करून भागवत धर्माचा पताका पोहचवून राष्ट्रीय एकात्मतेचे महान कार्य केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे सरचिटणीस महेश जोशी, उदय भालेराव, विशाल त्रिपाठी, प्रवासी प्रचारक विक्रम तरसोडिया, अजित राणे, सागर पाटील प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर, मंगेश जुनागडे, प्रकाश पंडित, चित्रा मालपाणी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!