जामनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील पळासखेडे येथे निलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय (मि.) येथे इयत्ता १० वी सन १९९८ च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. एल. पाटील यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील, एस.एस पाटील, वराडे, लोहार, डी.पी. पाटील, एस.आर.पाटील, एस.सी. चौधरी, एन.वाय. पाटील, आर.एस. चौधरी, एम.एल. पाटील, एम.डी. पाटील व भरत बापू आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भोसांडे यांनी केले. तर सूत्र संचालन माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमवेळी एस.एस. पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आरोग्याची गुरु किल्ली दिली, आर.एस.चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षांनी आपल्या भाषणातून माणूस म्हणून कस जगावं हे सांगितलं. विद्यार्थ्यांपैकी किरण हडप, मनोज सूर्यवंशी, निलेश सोनवणे, संजय वराडे व सुमित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर संमेलनास माजी विद्यार्थ्यापैकी सुमित पाटील, नितीन हडप, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, माधव अहिर, प्रमोद पवार, रमेश चोपडे, अनिल हडप, माणिक शिंदे, गोपाल हडप, किरण कोळी, प्रवीण कोळी, आनंदा लोहार, प्रवीण पवार, किशोर सोनार, विजय हडप, सुपडू सपकाळ, गणेश राजपूत, भगवान बोरसे, रतन बोरसे, अर्जुन खोडपे, गणेश भडगे, सतीश राजपूत, ललित वानखेडे, तुळशीराम पाटील, गोपाळ बोरसे इ. तसेच माजी विद्यार्थीनीं मधून मनिषा पाटील, माधुरी पाटील, शैलजा पवार, ललिता पाटील, निर्मला बागुल, रेखा जैन, जयश्री राजपूत, आरती पवार, कौशल्या हिवाळे, पुष्पा काळे, संदीपा पवार, कविता हडप, मुक्ता पवार, मिना परदेशी, सुवर्णा आगळे इ. विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांच्या या संमेलनात शाळेला माजी विदयार्थ्यांनी ३६ नग सिलिंग फॅन सप्रेम भेट दिले.
यावेळी सर्वांनी सोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. शेवटी मनोज सपकाळ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास भोसांडे, किरण हडप, संजय वराडे, खान्देश समाज भूषण सुमित पाटील, मनोज सूर्यवंशी, माधव अहिर, किरण कोळी, माधुरी पाटील, आरती पवार, मनीषा पाटील, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, अनिल हडप, नितीन हडप, माणिक शिंदे यांनी प्रयत्न केले.
