जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आज दि.७ ऑक्टो २०२४ रोजी सकाळी १० वाजता ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ॲग्री अस्पायर २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. के.सी.ई. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ‘ॲग्री अस्पायर २०२४’ मध्ये विद्यार्थ्यांना पाच विषय देण्यात आले होते. त्यात १) न्यू ॲग्री टेकनॉलॉजी, २) रिन्यूएबल एनर्जी, ३) वॉटर मॅनेजमेंट, ४) ए.आय. इन ॲग्रीकल्चर, ५) क्लायमेट स्मार्ट ॲग्रीकल्चर. दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

या कार्यक्रमात एस्पायर नंबर १ टीम ने ऑरगॅनिक फॉर्मिंग चे फायदे, एस्पायर नंबर २ टीम ने ओनियान पावडर विथ सोलर सिस्टम, एस्पायर नंबर ३ टीम ने व्हर्टिकल फॉर्मिंग, एस्पायर नंबर ४ टीम ने रिजनरेटिव्ह फॉर्मिंग, एस्पायर नंबर ५ टीम ने न्यू ॲग्री टेक्नोलॉजी-डेट्स कॉफी, एस्पायर नंबर ६ टीम ने वॉर्मिंगपोस्ट ऑरगॅनिक मॅन्युअर अशा वेगवेगळ्या संकल्पनेवर अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी दीपक माळी व हर्ष कोटेचा यांनी विद्यार्थी प्रतिनिधी तसेच प्रा.रवींद्र स्वामी यांनी शिक्षक समन्व्यक म्हणून जबाबदारी भूषवली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख स्टार्ट्स अप वर भर दिल्यास आपला देश रोजगार निर्मितीत जगात अग्रेसर असेल, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे त्यांच्या कार्यांचे प्राचार्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात नवीन तंत्रज्ञाना विषयी विचार करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. वीणा भोसले (विभाग प्रमुख,अग्री बिझनेस मॅनेजमेंट) यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला प्रा. हर्षा देशमुख, प्रा. शेफाली अग्रवाल, प्रा. गोडबोले, प्रा. तनया भाटिया, प्रा. डिगंबर सोनवणे, प्रा. हेमंत धनंधरे, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा. रेवती पाटील उपस्थित होते.
