Home » जळगाव » इनरव्हील क्लब जळगाव यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

इनरव्हील क्लब जळगाव यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इनरव्हील क्लब जळगाव च्या अध्यक्षा उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, वाईस प्रेसिडेंट डॉ. मयूरी पवार, प्रोजेक्ट चेयरमैन प्रतिभा जैन व क्लब चे इतर सदस्य यांनी रावेर जवळील आदिवासी पाडा येथे जाऊन तेथील जवळ जवळ ३० आदिवासी कुटुंबाला दिवाळीसाठी साहित्य वाटप करून मदत केली.

यावेळी प्रतिभा जैन यांच्याकडून किराणा साहित्य, सुजाता वीरेंद्र मुणोत यांच्या कडून ब्लँकेट, तृप्ती चौबे यांच्या कडून मिठाई व नमकीन, निशिता रंगलानी यांच्या कडून बिस्किट वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!