Headlines
Home » जळगाव » मु.जे. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी शिबिर संपन्न

मु.जे. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे चान्सलर ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन शिबिर निवड चाचणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांनी भुषवले. तसेच शिबिराचे उद्घाटन डॉ.सचिन नांद्रे यांनी दीप प्रज्वलन करून केले.

आपत्ती व्यवस्थापन शिबिर विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी व देशासाठी किती महत्त्वाचे आहे याचे सखोल मार्गदर्शन प्राचार्य डॉ.भारंबे यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमासाठी प्रा. सुरेखा पालवे व्यवस्थापन परिषद सदस्य कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच डॉ. दिनेश पाटील जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. दिलीप गिरे विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. राजू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री भिरूड यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विशाल देशमुख कार्यक्रमाधिकारी मु.जे. महाविद्यालय जळगाव तसेच सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अखिलेश शर्मा राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!