Home » महाराष्ट्र » रवी राणांना मोठा धक्का ; विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

रवी राणांना मोठा धक्का ; विश्वासू सहकाऱ्याने सोडली साथ

अमरावती ( वास्तव पोस्ट ) : अपक्ष आमदार रवी राणा यांना अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. तसेच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झालेली दिसून येत आहे.

सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश करत आहेत. तर महाविकासाघाडीतही हीच परिस्थिती आहे. अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. ते रवी राणा यांचे अंत्यत विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याचे समते.

मागील १७ वर्षांपासून आमदार रवी राणा हे युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहेत. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या १७ वर्षांपासून जितू दधाने हे आमदार रवी राणा यांच्यासोबत काम करत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दुधाने यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “युवा स्वाभिमान संघटनेत माझी घुसमट होत आहे. त्यामुळे मला जबाबदारीतून मुक्त करां”, असे जितू दुधाने यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांच्या राजीनामा पाठवला आहे. जितू दुधाने यांनी राजीनामा देण्यामागील नेमके कारण काय याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!