दिल्ली दि .३ ( प्रतिनिधी ) – अयोध्येतील राम मंदिर आंदोलनातील सर्वात मोठा चेहरा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . ९६ वर्षीय अडवाणी यांनी स्वतः या संदर्भात एक निवेदन जारी केले .
लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज मला प्रदान करण्यात आलेला ‘भारतरत्न’ मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार ज्या तत्त्वांची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या तत्त्वांबद्दलही आदर आहे.”
भारतरत्न मिळाल्यानंतर त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या दोन मोठ्या नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “माझ्या सार्वजनिक जीवनातील माझ्या संपूर्ण प्रवासात ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले त्या माझ्या पक्षाचे लाखो कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि इतरांचे मी मनापासून आभार मानतो.” आयुष्यात जे काही कार्य माझ्यावर सोपवण्यात आले आहे त्यात माझ्या प्रिय देशासाठी स्वतःला समर्पित करून निस्वार्थ सेवा केली. “हे जीवन माझे नाही. माझे जीवन माझ्या राष्ट्रासाठी आहे.”
